पाकचे ख्यातनाम कव्वाल अमजद साबरींची गोळ्या झाडून हत्या

June 22, 2016 6:30 PM0 commentsViews:

22 जून : पाकिस्तानचे ख्यातनाम कव्वाल अमजद साबरी यांची कराचीत दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शहरातल्या लियाकतबाद भागात त्यांच्या गाडीवर हल्लोखोरांनी गोळ्या झाडल्या. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. साबरी यांच्या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडालीये.

sabariअमजद साबरी दुपारी आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी मोटरसायकहून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात साबरी गंभीर जखमी झालेत, त्यांना जवळच्या अब्बासी शहीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यात दोन तर चेहर्‍यावर एक गोळी झाडण्यात आली. अमजद साबरी हे अंत्यत लोकप्रिय कव्वाल होते. त्यांच्या कव्वालीचे जगात अनेक चाहते आहेत. प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांनी साबरी यांच्या हत्येवर दुख व्यक्त केलंय. पाकिस्तानमध्ये चाललंय काय ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थिती केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा