प्रख्यात गायक मुकुल शिवपुत्र यांच्याकडून चोरट्याने 75 हजार लांबवले

June 22, 2016 7:48 PM0 commentsViews:

mukul_shivputraपुणे – 22 जून : प्रख्यात शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र यांना पुण्यात चार चोरट्यांनी लुटलंय. शिवपुत्र यांच्याकडून तब्बल 75 हजारांची रोकड लुटण्यात आलीये.

मुकुल शिवपुत्र हे पुण्यातल्या सारसबागेत कार्यक्रम करुन घरी परतत होते. रस्त्यात त्यांचा भाजीवाल्याशी वाद झाला. या वादावादीची संधी साधून चार चोरट्यांनी त्यांच्याजवळची 75 हजारांची रोकड लांबवलीये. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकुल शिवपुत्रांना लुटणार्‍या चोरांचा पोलीस शोध घेत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा