भर दिवसा लुटले ज्वेलर्सचे दुकान

April 2, 2010 1:30 PM0 commentsViews: 2

2 एप्रिलमुंबईत एका ज्वेलर्सवर भर दिवसा सात ते आठ सशस्त्र युवकांनी दरोडा टाकला. मिरा रोड पूर्वेकडील पूनम सागर कॉम्प्लेक्समधील मंगलम् या ज्वेलर्सच्या दुकानात हे दरोडेखोर तोंडावर रूमाल बांधून हातात चॉपर आणि रिव्हॉल्व्हर घेउन आले होते. त्यावेळी दुकानात ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. दरोडेखोरांनी दुकान मालक दिनेश जैन आणि रखवालदारावर चॉपरने वार करून त्यांना जखमी केले. आणि दुकानातील ग्राहकांना धमकावत तब्बल बारा लाख रुपयांचे सोने लुटून हे दरोडेखोर फरार झाले. पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

close