बियाणं खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे 24 वर्षीय तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

June 22, 2016 8:25 PM0 commentsViews:

latur_farmerलातूर – 22 जून : बियाणं खरेदीसाठी पैसे नसल्याच्या नैराश्यातून लातूर जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकर्‍यानं आत्महत्या केलीये. विजयकुमार सूर्यवंशी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. विजयकुमार सुर्यवंशी असं या तरूण शेतकर्‍याचं नाव असून त्याचं वय फक्त 24 वर्ष होतं.

तीन वर्षांपूर्वी बहिणीच्या लग्नासाठी तीन एकर शेतीवर खासगी सावकाराकडून तीन लाखांचं कर्ज घेतलं होत. मात्र तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे विजय नारळ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेला होता. मात्र, गावाकडे पाऊस चांगला झाला असल्याने तो पुन्हा गावात आला होता. हातात पैसे नसल्यानं विजयनं पेरणी साठी उधारीवर बी बियाणे आणि खत मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे पेरणी कशी करायची या विवंचनेत विजयकुमार होता. याच निराशेतून रात्री त्याने आत्महत्या केलीय. या घटनेने निलंगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा