शेतकरी राजा, हताश होऊ नकोस…

June 22, 2016 9:55 PM0 commentsViews:

ibnl23422 जून : पेरणीचे दिवस सुरु आहेत…सुदैवानं यावर्षी चांगला पाऊस पडतोय. बी-बियाणांच्या खरेदीसाठी पैसे नसले तरी हताश होऊ नका आणि आत्महत्येचा विचार तर दूरच…तुमच्याकडे गेल्यावर्षी उत्पादित झालेली आणि घरी उपलब्ध असलेली तूर, मूग, मका, बाजरी, उडीद, सोयाबीन ही सुधारित वाणांची बियाणं यावर्षी तुम्ही पेरू शकता. सोबतच, दिलासा संस्था आणि सेवाग्राम संस्थेच्या माध्यमातून अल्प भू-धारक शेतकर्‍यांसाठी 30 जूनपर्यंत काही प्रमाणात मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

यासाठी तुम्ही थेट या संस्थांशी संपर्क साधू शकता. त्यांचा पत्ता खालीलप्रमाणे -

1. दिलासा संस्था
घाटंजी, यवतमाळ
संपर्क – मधुकर धस, मन्सूर कुरेशी, वंदना गोयल
मोबाईल – गंगाराम अत्राम (कृषी समन्वयक) – 9765933586

2. विनायकराव पाटील (सेवाग्राम संस्था)
मु.पो. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद
मोबाईल – 9421195999


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा