मालाड आणि कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड

June 23, 2016 1:42 PM0 commentsViews:

मुंबई – 23 जून : मुंबईतल्या मालाडजवळ मालवणी भागात आणि कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही ठिकाणी एकाच कुटुंबातील तिघांच्या निर्घृणपणे हत्या करण्यात आलीये.

kolhapur crimeमालाडमधील न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणार्‍या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं. मृतांमध्ये आजी आणि तिच्या दोन नातवंडांचा समावेश आहे. 47 वर्षी बबली शॉ असं महिलेचं नाव असून 13 वर्षांचा आर्यन इस्माईल शेख आणि 8 वर्षांची सानिया इस्माईल शेख यांची हत्या झाली. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांची हत्या केली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरदुसरीकडे कल्याण हाजीमलंग रोडवरील करवळे गावात तिहेरी हत्याकांडाची घटना घडलीये. यामधे एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलगा यांची राहत्या घरात कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. ही घटना पुर्ववैमनस्य किंवा चोरीमुळे झालीय का या दोन्ही बाजूने पोलीस तपास करतायत. 55 वर्षीय शंकर भंडारी, 45 वर्षी फसुबाई भंडारी आणि 22 वर्षीय शनि भंडारी अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा