गुरुदास कामत यांचे बंड थंड, राजीनामा घेतला मागे

June 23, 2016 2:15 PM0 commentsViews:

Gurudas kamat2131423 जून : काँग्रेसचे नाराज नेते गुरुदास कामत यांनी पुकारलेलं बंड अखेर थंड झालंय. कामत यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतलाय, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी भेटून चर्चा केल्यानंतर कामत यांनी राजीनामा परत घेतला आहे. याबद्दल्यात काँग्रेसने कामत यांच्यावर महासचिव, गुजरात आणि राजस्थानचे प्रभारीपद पुन्हा सोपवलं आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मोहन प्रकाश आणि संजय निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे नाराज झालेल्या कामत यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून काँग्रेस नेतृत्व सातत्याने त्यांची मनधरणी करीत होते. ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यस्थी करून कामत यांच्या सगळ्या तक्रारी दूर करू असं आश्वासन दिलं होतं. आज काँग्रेसने एक प्रसिद्धी पत्रक काढून कामत यांनी राजीनामा परत घेण्याची घोषणा केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा