पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे द्यायची राज्य सरकारची तयारी

June 23, 2016 2:31 PM0 commentsViews:

pansare new23 जून : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास सीबीआयला देण्यासाठी राज्य सरकारनं तयारी दाखवली आहे. प्रधान सचिव रजनीश सेठ यांनी मेधा पानसरेंना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.

पानसरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी विशेष तपास पथकानं आतापर्यंत सनातनच्या समीर गायकवाड या साधकाला अटक केली. त्याचबरोबर सखोल तपासही केला आहे. असा उल्लेख प्रधान सचिवांच्या पत्रात करण्यात आलाय. यानंतरही पानसरे कुटुंबीयांची इच्छा असेल तर राज्य सरकारची सीबीआय तपासास हरकत नाही असंही या पत्रात कळवण्यात आलंय.

दरम्यान दुसरीकडे, प्रा. कलबुर्गी प्रकरणी कर्नाटक पोलीस विरेंद्र तावडेला ताब्यात घेण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज कोल्हापूर आणि पुणे न्यायालयात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच पानसरे हत्या प्रकरणी चौकशीसाठी तावडेला उद्यापर्यंत कोल्हापूरला आणलं जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा