शिवाजी पार्कवरचा जनता दरबार उधळला

April 2, 2010 2:38 PM0 commentsViews:

2 एप्रिलशिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा वादाला आता राजकीय रंग मिळाला आहे. आज महापालिकेने शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात सुशोभीकरण करताना नागरिकांच्या सूचनांचा विचार केला पाहिजे असे, नागरिकांनी ठामपणे सांगितले. पण अचानक इथे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला. त्यानंतर मग घोषणाबाजीतच हा जनता दरबार उधळला गेला.पण नागरिकांनी सुशोभिकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अतिक्रमणाला आपला विरोध कायम असल्याचे सांगितले.पण महापालिका नागरिकांच्या या विरोधाबाबत गंभीर नसल्याचे यावेळी दिसले. कारण महापौरांनी आयोजित केलेल्या या बैठकीला खुद्ध महापौर श्रद्धा जाधव याच उपस्थित राहिल्या नाहीत. एकंदरीतच ज्या हेतूसाठी हा जनता दरबार होता तो हेतूच या गोंधळात वाहून गेला.

close