सोलापुरात प्रेमसंबंधांच्या संशयातून जन्मदात्यानीच घोटला मुलीचा गळा

June 23, 2016 4:29 PM0 commentsViews:

23 जून : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या युवतीचा तिच्या कुटुंबीयांनीच गळा दाबून खून केल्याची घटना सोलापुरात घडलीये. ऑनर किलिंग अर्थात खोट्या प्रतिष्ठेपोटी हा प्रकार केला आहे की काय असा संशय निर्माण झाला आहे. शोभा मल्लिकार्जुन वाघमारे असं या खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे.

shobha_waghmareसोलपुरातील सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या परिसरात राहणारी शोभा मल्लिकार्जुन वाघमारे ही युवती सकाळच्या सुमारास घरात अचानकपणे कोसळून पडली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी तिच्या देहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितलं. त्यात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं उघड झालं.

मात्र कुटुंबीयांनी तिचा मृत्यू अकस्मात झाल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणी कुटुंबीयांना तपासासाठी ताब्यात घेतले असून ते तपासात मदत करत नसल्याने पोलिसांची संशयाची सुई कुटुंबातील व्यक्तींकडे जातंय. शिवाय फिर्याद नोंदवण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.

मात्र तिचा मृत्यू अकस्मात झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढलंय. पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन अज्ञाताविरोधात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तसंच वडिलांसह आई आणि दोन भावांना सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा