ड्रोन कॅमेर्‍यातून खडकवासला !

June 23, 2016 5:15 PM0 commentsViews:

पुणे – 23 जून : पुणे शहराची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणातला गाळ काढण्याचं काम आता जवळपास पूर्ण होत आलंय. गाळ काढल्यामुळे आता खडकवासला धरणाची पातळी वाढणार आहे. याच धरणाचं नयरम्य रूप ड्रोन कॅमेर्‍यात टिपण्यात आलंय.

कर्नल सुरेश पाटील यांच्या ग्रीन थम या संस्थेमार्फत लोकसहभागातून हा सर्व गाळ काढला जातोय. या धरणाच्या बॅकवाटरमधून आतापर्यंत तब्बल 4 लाख ट्रक पेक्षा अधिक गाळ काढण्यात आलाय. विशेष म्हणजे गाळ काढताना एकही झाडं तोडली जाणार नाहीत याचीही काळजी घेण्यात आलीय.

गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम सुरू होता. याकामासाठी लष्कराचे जवान तसंच माजी सैनिकांनीही मोठ्या प्रमाणावर हातभार लावलाय. त्याचेच फलित म्हणून यंदा या धरणाची साठवणक्षमता मोठ्या प्रमाणात वाढलीय. खडकवासला साखळी धरणांची एकूण क्षमता 30 टिएमसी आहे. पण 61साली पानशेत धरण फुटल्याने वरच्या तीनही धरणांमधला सगळा गाळ हा या खडकवासला धरणात येऊन साठला होता.

परिणामी जल साठवण क्षमता देखील 3.7 टीएमसी वरून अवघ्या पावणेदोन टीएमसीवर येऊन ठेपली होती .पण आता बर्‍यापैकी गाळ काढला गेल्याने धरणाची साठवण क्षमता किमान पावणे दोन टीएमसीने वाढणार आहे. म्हणूनच आपण हेच खडकवासला धरण आता अवकाशातून नेमकं कसं दिसतंय. याचं ड्रोन शूट खास आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा