भ्रष्टाचार दूर करण्यासाठी थेट औषध खरेदी

April 2, 2010 3:00 PM0 commentsViews: 2

2 एप्रिलऔषध खरेदीतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी थेट कंपनीकडूनच औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानसभेत ही घोषणा केली. यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात येईल. कुणाकडून औषधे खरेदी करायची त्याचा निर्णय ही समिती घेईल. या समितीत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे 2 सदस्य, अन्न आणि औषध विभाग, पोलीस, अर्थ खाते यांच्यातील प्रत्येकी एक अधिकारी तसेच दोन नामवंत डॉक्टरांचा समावेश असणार आहे.

close