मुख्यमंत्र्यांचा दणका, महसूल विभागात बदल्यांचे अधिकार आता विभागीय आयुक्तांकडे !

June 23, 2016 6:52 PM0 commentsViews:

fadanvis23 जून : राज्य मंत्रिमंडळातील मलईदार खात्यापैकी एक असलेल्या महसूल विभागातल्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना आता चाप बसवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बदल्यांचे अधिकार हे विभागीय आयुक्तांकडे सोपवले आहे.

महसूलमंत्री या नात्याने निर्णय घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण व्हायला नकोत, या हेतूने महसूल खात्याच्या मंत्रिस्तरावरील काही महत्त्वाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महसूलमत्र्यांच्या अधिकारांवर मर्यादा येणार आहे. या निर्णयामुळे महसूलमंत्र्यांचे अधिकार संपणार आहे.

विविध प्रकारच्या सेवा, मुलकी सेवा, जमीन आणि जमीनविषयक कायदे आदींसह त्यांची अंमलबजावणी यामुळे महसूल खात्याचे महत्त्व इतर खात्यांच्या तुलनेने अनन्यसाधारण असते. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना असणार आहे. महसूल विभागात होणार्‍या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांनाही चाप बसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था-जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना आपल्या पसंतीचा महसूल अधिकारी मिळण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा