पुण्यात सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश,3 महिलांना अटक

June 23, 2016 8:20 PM0 commentsViews:

पुणे – 23 जून : पुणे पोलिसांनी सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. गरजू आणि गरीब महिलांना फसवून या महिला त्यांची बिजांड बेकायदेशीरपणे आयव्हीएफ सेंटर्सला विकत होते. एका हत्येचा तपास करीत असताना हे सगळं रॅकेट उघडकीस आलंय.

Surrogacyराज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आता सरोगसी रॅकेटचा अड्डा झालाय. पुण्यातल्या मधू ठाकूर नावाच्या महिलेच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास करताना ही धक्कादायक माहिती समोर आलीये. पोलिसांनी या रॅकेटमधल्या पाच जणांना अटक केलीये. समाजसेविकेच्या बुरख्याखाली फिरणार्‍या महिला गरजू आणि गरीब महिलांना हेरुन त्यांची बिजांडं आयव्हीएफ सेंटरला पुरवत होते.

या रॅकेटमधल्या महिलांचं काही टेस्ट ट्यूब बेबी सेंटरशी साटंलोटं होतं. या रॅकेटमधील महिला सावज हेरायच्या आणि हे सावज या आयव्हीएफ सेंटरमध्ये आणलं जायचं.

या रॅकेटमधील माया मोरे या महिलेनं मधू ठाकूर हिचं अपहरण केलं तिच्या मुलाची विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करणार्‍या मधू ठाकूरची हत्या करण्यात आली.

पोलीस आता मधू ठाकूरच्या मुलाचं बाळ कुणाला विकायला लावलं होतं. आणि सरोगसी रॅकेटची पाळमुळे किती खोलवर रुजलीयेत याचा तपास करतायेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा