दुष्काळानं आणलं माणसांना जवळ, दुष्काळ निवारण्यासाठी तरुणाचा पुढाकार !

June 23, 2016 8:59 PM0 commentsViews:

23 जून : कर्नाटकात असलेल्या गुंठाळी गावात बहुतेक मराठी लोक राहतात. मुळच्या महाराष्ट्रातल्या आणि सध्या कर्नाटकात राहत असलेल्या काही तरुणांनी राम रहिम ही संस्था स्थापन केलीये. राजेश पाटील हा तरूण सध्या जपानमध्ये नोकरी करतो. पण त्यानं आपल्या मित्रांना सोबत घेऊन राम रहिम ही संस्था स्थापन केलीये. या संस्थेच्या माध्यमातून फक्त आपल्या गावासाठी नाही तर पंचक्रोशीसाठी पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

osmanabad3हे आहे गुंठाळ गाव महसुली नोंदी नुसार हे कर्नाटक राज्यात आहे. मात्र, या गावात बहुतेक मराठी लोक राहतात. त्यामुळे ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था या गावाची झाली आहे. पाणी आरोग्य या मुलभूत सुविधा देखील या गावांना मिळत नाहीत. गावाला या चक्र विव्हतून बाहेर काढण्यासाठी जपानमध्ये नोकरी करत असलेला मात्र मुळ मांनाळी गावाचा राजेश पाटील हा तरुण पुढे सरसावला. त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेत राम रहिम ही संस्था स्थापन केली यांच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा आणि इतर सुविधा पुरवत आहेत.

या तरुणांनी केवळ आपल्या गाव पुरताच विचार न करत आसपासच्या गावाला ही संस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता पंचक्रोशीत राम रहिम ही सामाजिक संस्था दुष्काळाग्रस्त गावासाठी वरदान ठरत आहे.

दुष्काळ निवारण करणे ही शासनाची जबाबदारी नाही तर समाज म्हणून या संकटावर मात करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने आप आपल्यापरीने केला पाहिजे हेच पुन्हा एकदा राम रहिम संस्थेने करून दाखवले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा