ब्रिटनच्या ‘एक्झिट’मुळे भारतावर कोणते परिणाम?

June 24, 2016 4:43 PM0 commentsViews:

india_brexit24 जून : ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनच्या या ब्रेक्झिटमुळे जगभरात याचे परिणाम होणार आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याबद्दल जाणून घेऊया…

- शेअर बाजारात झालेली घसरण हा तात्पुरता परिणाम असेल
– अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारताची परकीय गंगाजळी मजबूत
– सध्या भारताकडे 363 अब्ज डॉलर्स इतकं परकीय चलन
– ब्रिटनमध्ये मोठा आर्थिक व्यवहार असलेल्या भारतीय कंपन्यांना फटका
– सध्या 800 भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये कार्यरत
– या सर्व कंपन्यांमध्ये मिळून 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी
– अल्प काळासाठी आयटी कंपन्यांवर विपरीत परिणामाची शक्यता
– दीर्घ मुदतीमध्ये आयटी कंपन्यांची कामगिरी संमिश्र राहण्याची शक्यता
– भारत आणि ब्रिटनचा सध्याचा द्विपक्षीय व्यापार 14 अब्ज डॉलर्स, तो कायम राहण्याची अपेक्षा
– गेल्या दशकभरात भारत आणि ब्रिटनदरम्यानच्या व्यापारात सातत्यानं वाढ
– त्याच कालावधीत युरोपियन युनियनबरोबरच्या एकूण व्यापारात घट
– आता भारताला युरोपियन युनियनमधल्या इतर देशांबरोबरचा व्यापार वाढवण्याची संधी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा