औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात पांढर्‍या वाघिणीचा मृत्यू

June 24, 2016 7:38 PM0 commentsViews:

geeta_tigarऔरंगाबाद -24 जून : औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानात एका पांढर्‍या वाघिणीचा मृत्यू झालाय. वृद्धपकाळानं गीताचा मृत्यू झाल्याचं औरंगाबाद महापालिकेनं खुलासा केलाय.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील गीता नावाची ही वाघीण अठरा वर्षांची होती. गेल्या आठ दिवसांपासून ती आजारी होती. गीताचे यकृत आणि श्वसननलिका काम करीत नसल्यानं तीन खाणं बंद केलं होतं. आसाम मधून आणलेल्या पांढर्‍या जातीच्या जोडप्यापासून गीता चा जन्म उद्यानातच झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा