एकाच कुटुंबातल्या चार जणांनी केली बोरिवलीत आत्महत्या

October 13, 2008 4:11 AM0 commentsViews: 12

13 ऑक्टोबर, मुंबई -बोरिवली इथल्या रहेजा इस्टेटमध्ये एकता वूड सोसायटी रूम नंबर 712 मध्ये चार मृतदेह आढळले आहेत. हे चारही जण एकाच कुटुंबातले आहेत. ही आत्महत्या असावी, असा पोलिसांचा संशय आहे. एस.के.नायर, त्यांची पत्नी शमीला नायर यांनी मुलगा सुधीर नायर आणि सून सुचित्रा नायर यांच्यासह आत्महत्या केलीय असं आतातरी तपासात समोर आलं आहे. सुधीर नायर हे भेल कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर होते. नायर परिवारीतील दोघांनी फॅनला लटकून आत्महत्या केली आहे, तर दोघंानी वीष पिऊन.सुधीर नायर यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ट्ीवर 10 ऑक्टबरची तारीख आहे. या चिठ्टीत लिहलं आहे की, आम्ही आमच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहोत. त्यामुळे आमच्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. तसंच आमची बॉडी आमच्या नातेवाईकांना न देता, पोलिसांनी किंवा अन्य कोणी आमची अंतीम संस्कार करावा पत्राच्या शेवटी सुधीर नायर आणि त्याची पत्नी सुचित्रा नायर यांची सही आहे. एस. के. नायर 70 वर्षांचे होते तर त्यांची पत्नी शमिर्ला नायर यांचं वय 65 वर्षं आहे.

close