भाजप-सेनेत ‘शोले’ राडा, उद्धव ठाकरे ‘असरानी’ तर शहा ‘गब्बर’ !

June 24, 2016 6:13 PM0 commentsViews:

24 जून : शिवसेना आणि भाजपमध्ये वाद काही नवा नाही. पण, आता हा वाद एकमेकांची उणीदुणी काढण्यावर येऊन ठेपला आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे शोले चित्रपटातले ‘असराणी’ असल्याची उपाहासात्मक टीका झाली. त्यावर ताबडतोड अमित शहा ‘गब्बर’ असल्याची टीका सेनेनं केली. हा वाद आता चांगलाच विकोपाला गेला असून मोदींच्या पुण्यातल्या स्मार्टसिटीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिलाय. एवढंच नाहीतर आमच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार तरलंय हे लक्षात ठेवा असा इशाराच सेनेनं दिलाय.

sena on bjp seatsआपलाच मित्रपक्ष असलेल्या भाजपविरोधात शिवसैनिक पुन्हा खवळलेत. यावेळी निमित्त आहे ते माधव भांडांरींच्या मनोगतमधील टीकात्मक लेखाचं…या लेखात भांडारींनी उद्धव ठाकरेंना शोले मधल्या आसराणीची उपमा देताच शिवसैनिकांनी थेट अमित शाहांनाच गब्बरची उपमा देऊन टाकलीय.

सोशल मीडियातूनही सेना-भाजपातलं कार्टून वॉर पुन्हा पेटलंय. मनोगतमधलं भांडारींचं हे व्यक्तिगत मत असल्याचं भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं असलं तरी शिवसेना मुख्यमंत्र्यांनी निवेदनावर ठाम आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेनं केलीय. संजय राऊतांनी तर भांडारींचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. शिवसेनेतली खदखद उफाळून आली तर भारी पडेल, असा इशाराच सेनेनं दिलाय. त्यावर माधव भांडारी काहिसा सावध पवित्रा घेतलाय.

सेना-भाजपतली ही तूतू-मैमै खरंतर महाराष्ट्राच्या जनतेलाही आता नवीन राहिलेली नाही. पण यावेळी पहिल्यांदाच भाजपकडून भांडारींनी बोचरी टीका केल्याने सेनेच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. म्हणूनच आतापर्यंत सोशल वॉरपुरतं मर्यादीत असलेलं हे भांडण यावेळी रस्त्यावर उतरतंय. बघुयात हा वाद आणखी किती ताणला जातोय त्यावरच मुंबई मनपातल्या युतीचं भवितव्य ठरणार आहे.

भांडारी यांचं ‘मनोगत’
“शोलेमध्ये जेलर झालेला असरानी आपल्या पोलीस शिपायांना ‘आधे इधर जाओ,आधे उधर जाओ और बाकी हमारे साथ आओ…’असा हुकूम सोडतो. त्याच्या हुकुमाप्रमाणं सगळे पोलीस शिपाई डाव्या आणि उजव्या दिशेला पांगतात… असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही… निजामाच्या बापाशी तलाख घेतला तर आपल्यामागे एकही आमदार राहणार नाही अशी भीती माननीय कार्याध्यक्षांना वाटते की काय? “

संजय राऊत, तलाख कधी घेतायत?
“निजामाच्या बापाचा जाच सहन होत नसेल तर राऊत महाशयांनी बाणेदारपणे सत्तेचं ताट लाथाडायला हवं होतं. तसं करण्याचं धाडस श्रीमान राऊत दाखवत नाहीत, राऊत महाशयांनी भाजप-शिवसेना युतीचा इतिहास आपल्या माननीय कार्याध्यक्षांकडून माहिती करून घ्यावा.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा