भाजपकडून युद्धबंदी, आता नेत्यांवर टीका नको !

June 24, 2016 8:48 PM0 commentsViews:

danve and sena24 जून : भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांची शोलेगिरी सुरू असताना आता भाजपनं एकतर्फी युद्धबंदी जाहीर केलीये. युतीच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात काहीही बोलू नये असं आवाहन भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय. रावसाहेब दानवे यांनी दोन्ही बाजुच्या नेत्यांनी संयम बाळगावा असं आवाहन केलंय. एखाद्या वर्तमानपत्रात एखादी बातमी प्रसिद्ध झाल्यास ते पक्षाचं मत मानू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर, भाजपच्या धोरणांवर भाजपमधूनच टीका होते. मग आम्ही टीका केली तर बिघडलं कुठे ? भाजपने यांचं उत्तर द्यावं असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माधव भांडारी यांनी भाजपच्यापाक्षिकात उद्धव ठाकरे यांना असरानीची उपमा दिल्यानं शिवसेना चांगलीच दुखावलीये.  अमित शहा यांना कल्लूमामा ची उपमा देत पुण्यातील मंडईत सेनेनं उग्र आंदोलन केलं. भांडारी आणि शहा यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमांना जोडे मारले .एवढ्यावरच शिवसैनिक थांबले नाही तर बांगड्यांचे हार घातले भरीस भर म्हणून सेनेनं उद्या पुण्यात होणार्‍या पंतप्रधान मोदी यांच्या स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमावर बहिष्कारही टाकला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा