मुंबईसह कोकणात पावसाचे धूमशान

June 25, 2016 6:38 PM0 commentsViews:

mumbai_local_rain27 जून -उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने चिंब भिजवलंय. मुंबईसह कोकणातील पावसाने चांगलेच धूमशान घातले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा मंदावलीये. तिन्ही मार्गांवर १५ ते २० मिनिटे उशिराने लोकल धावत आहे.

तो आला त्याने पाहिलं…आणि त्याने सगळ्यांना कवेत घेतलं असंच वर्णन मुंबई आणि कोकणाच्या पावसाचे करावे लागलं.
मुंबई आणि कोकणात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रात्री झालेल्या पावसामुळं हिंदमाता आणि परळसारख्या सखल भागात पाणी साचलं होतं. पण पहाटेच्या सुमारास पावसानं काहीकाळ विश्रांती घेतली होती. त्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. काही तासांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झालीये. पाऊस सुरु असला तरी मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे. मुंबईत चार वाजता समुद्रकिनारी भरतीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. पावसामुळं शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना सुरुवात झालीये. मात्र, अजूनही राज्यभऱात पावसाने हजेरी लावलेली नाहीये. त्यामुळे सर्वदूर वरुणराजे कधी पोहचता याकडे बळीराजा चातका सारखी वाट पाहुन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा