पंतप्रधान मोदी येण्याच्या आधीच काँग्रेसने आंदोलन गुंडाळले

June 25, 2016 6:55 PM0 commentsViews:

congress_flag27 जून – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रय़त्न काँग्रेस कार्यकर्त्यांचा फसला. पोलिसांनी नोटीस दिल्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येण्याच्या आधीच नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते मोकळे झाले.

पुण्यात स्मार्टसिटी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहे. पण पंतप्रधान दिल्लीमध्ये असतानाच पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पंतप्रधानांविरोधात काळे झेंडे दाखवावे लागले. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दुपारी दीड ते दोन या अर्ध्या तासांची निदर्शनं करण्यासाठी परवानगी दिली होती. स्मार्टसिटी ही योजना केवळ धुळफेक आहे असा आरोप करत मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचे नियोजन होतं.   आंदोलन केलं तर कारवाई केली जाईल अशा नोटीसा कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यामुळे मोदी दिल्लीत असतानाच झेंडे दाखवण्याची वेळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा