‘विराट कोहलीला भारतरत्न द्या !’

June 26, 2016 2:45 PM0 commentsViews:

26 जून : टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीला देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गाैरव करावा अशी मागणी आता पुढे आलीये.  ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे विराट कोहलीचा ‘भारतरत्न’ने देण्याची मागणी केलीये.

Virat kohli

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कोहलीच्या भारतरत्नसाठी मागणी करण्यात आलीये. सचिन तेंडुलकरप्रमाणेच विराटने दमदार कामगिरी केलीये आहे त्यामुळे त्याला भारतरत्न द्यावा अशी विनंती केलीये. आतापर्यंत क्रीडाक्षेत्रातून फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आलाय. हाॅकीचे जादूगार ध्यानचंद यांनाही भारतरत्न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. पण त्याचा अजून निर्णय झालेला नाही. पण, आता भारतरत्नसाठी विराट कोहलीचं नाव पुढे आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा