मुंबईची ‘डेथलाईन’, 35 दिवसांत 355 जणांचा मृत्यू

June 26, 2016 2:51 PM0 commentsViews:

मुंबई- 26 जून : मुंबईची लाईफलाईन अर्थात मुंबईकरांची लोकल…पण आता हीच लोकल डेथलाईन ठरत आहे. 20 मे ते 25 जून या 35 दिवसांच्या कालावधीत लोकल ट्रेननं प्रवास करताना 355 जणांचा मृत्यू झाला, तर 398 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी काही अपघात आहेत, काही आत्महत्या आहेत तर काही जण टपावरून प्रवास करताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

mumbai local accidentया सर्व घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, जन सुविधा सेवा समिती, आधुनिका स्त्री विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं कुर्ला रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे प्रवासी जागरूकता रेल्वे प्रवासी जागरूकता अभियान राबवण्यात आले. या वेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या 182 या क्रमाकांच्या हेल्प लाईनची माहिती प्रवाशांना करून देण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात थोड्यासा वेळ वाचावा म्हणून जीवाशी खेळतात, तसंच अनेक युवक लोकल मध्ये स्टंट करतात, लोकलच्या छतावरून प्रवास करतात हा सर्व प्रकारात अनेकांचे जीव देखील जातात. या सर्व प्रकाराला आळा बसावा म्हणून कायदेशीर कारवाई देखील केली जाते. परंतु या प्रवाश्यांमध्ये जनजागृती देखील त्यांच्यात आणणे गरजेचे असल्याने हे अभियान राबविण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा