बंडोबांना काँग्रेसचा दणका

April 4, 2010 7:11 AM0 commentsViews:

4 मार्चजिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणार्‍या अनेक नेत्यांवर काँग्रेस हायकमांडने कारवाईचा बडगा उगारला आहे. स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी पक्षाचा व्हीप न पाळता या कार्यकर्त्यांनी आघाड्या केल्या होत्या. लातूर, अहमदनगर आणि परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली होती. आणि बंडखोर उमेदवार निवडून आले होते. या तिन्ही ठिकाणी पराभव झालेले पक्षाचे अधिकृत उमेदवार हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या समर्थक गटातील होते. दिल्लीकरांनी या सर्व पराभवांची गंभीर दखल घेतली आहे. आणि या तिन्ही जिल्हा परिषदेतील बंडखोर करून सत्तेवर आलेल्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विलासरावांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाच दिलेला हा झटका असल्याचे मानले जात आहे. लातूरमध्ये विलासराव देशमुख समर्थक त्र्यंबक भिसे यांना अध्यक्षपदासाठी, तर दिलीप-पाटील यांना उपाध्यक्षपदासाठी पक्षानेअधिकृत उमेदवारी दिली होती. पण शिवराज पाटील यांच्या समर्थक गटाने भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने बंडखोर उमेदवार पंडितराव धुमाळ यांना निवडून आणले. त्यामुळे विलासराव नाराज झाले. अहमदनगरमध्ये कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. थोरातांचे पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनी बंडखोरी केली. बाळासाहेब थोरात विलासरावांचे समर्थक मानले जातात. तर विखे-पाटील मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे आहेत. परभणीतही बाळासाहेब जामकर यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला.

close