….मग आम्हीही तुमचे पुतळे आणि साहित्य जाळू, शेलारांचा सेनेला इशारा

June 26, 2016 3:06 PM1 commentViews:

मुंबई- 26 जून : जर शिवसेना आमचे साहित्य आणि पुतळे जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या आणि पुतळ्यांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिलाय. त्यामुळे शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या वादात आणखी भर पडणाची शक्यता आहे.shelar and uddhav

आज मुंबईत पंतप्रधानांच्या मन की बात हा कार्यक्रम जनतेसोबत ऐकण्यासाठी ‘मन की बात, चाय के साथ’ या कार्यक्रमाचं आयोजन भाजपाकडून करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणार्‍याना जनता लोकशाही बाहेर ठेवेल असं म्हणत पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्‍या शिवसेनेला टोला सुद्धा शेलारांनी लगावला.

भाजपचे नेते माधव भांडारी यांनी मनोगत या पाक्षिकामध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांना ‘असरानी’ अशी उपमा दिली होती. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये शोले राडा भडकला होता. सेनेनंही आपल्या स्टाईलमध्ये जोरदार पलटवार करत अमित शहांना गब्बर, माधव भांडारींनी सांबा अशी उपमा देऊन प्रतिहल्ला चढवला होता.

एवढंच नाहीतर माधव भांडारींची शिवसैनिकांनी पुतळा जाळला होता. यावर तोडगा म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. यापुढे कुणीही एकमेकांवर टीका करणार नाही असं दानवेंनी जाहीर केलं. पण आता आशिष शेलारांनी जशाच तसे उत्तर देण्याची इशारा देऊन वाद मिटणार नाही असं स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vijay Holkar

    Shelar Khupach Aaghau ani Ghamandi ahe….B.J.P. ne Mumbai Adhyakshya padi ekhadya Samanjas Vyaktichi Nemnuk karavi…Mala tar kadhi kadhi Shelar kontya Murkhachya isharyavar he Bashkal Waktavya kartat hech kalat nahi….