खडसेंना कॉल करण्यासाठी दाऊदवर इतकी वाईट वेळ आली का ?-राज ठाकरे

June 26, 2016 4:13 PM0 commentsViews:

मुंबई – 26 जून : एकनाथ खडसे आणि दाऊद कॉल प्रकरणावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. खडसेंना कॉल करण्याइतकी वाईट परिस्थिती दाऊद इब्राहिमवर आली का ? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

raj on khadseस्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या मराठी विद्यार्थ्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. तसंच एकनाथ खडसेंना तिरकस शैलीत कोपरखळी लगावली. मध्यंतरी एक बातमी वाचली, ‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकनाथ खडसेंना फोन’ हे वाचूनच मला प्रश्न पडला की, दाऊदचं सगळं काही संपलंय. एकनाथ खडसेंना फोन करण्याची दाऊदवर ही वेळ आलीये. दाऊद पाकिस्तानमधून सगळी सूत्र फिरवतोय..आणि तिथून त्याने खडसेंना फोन केला ‘हॅलो खडसे’… काहीही चाललंय. असा टोला लगावत राज ठाकरेंनी खडसेंची चांगलीच खिल्ली उडवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा