ओरिसात भूसुरुंग स्फोट; 10 जवान शहीद

April 4, 2010 7:46 AM0 commentsViews: 6

4 एप्रिल नक्षलवाद्यांनी ओरिसातील कोरापूट जिल्ह्यात भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे.या स्फोटात स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे 10 जवान शहीद झाले आहेत. तर 16 जण जखमी झाले आहेत. ओरिसात सध्या नक्षलवाद्यांविरोधात ग्रीनहंट मोहीम सुरू झाली आहे. चिदंबरम यांनी फटकारलेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचाराबद्दल फटकारले आहे. पश्चिम बंगालमधील लालगडला चिदंबरम यांनी आज सकाळी भेट दिली. आणि तेथील नक्षलविरोधी कार्यवाहीचा आढावा घेतला. नक्षलवादी कमकुवत झाले नाहीत, ते पुन्हा संघटीत होत आहेत, असा इशारा चिदंबरम यांनी दिला. सध्या नक्षलवादी शांत राहून आपल्या रणनीतीचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्याचा सध्या तरी सरकारचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

close