सावंतवाडीत मायनिंगविरोधी परिषद

April 4, 2010 8:19 AM0 commentsViews: 2

4 एप्रिल मायनिंग प्रदूषण वाहतूक आणि बेकायदेशीर मायनिंगच्या विरोधात लढा उभारण्यासाठी सावंतवाडीत आज मायनिंगविरोधी परिषद होत आहे. या परिषदेत भूगर्भशास्त्रज्ञ, कायदेशीर सल्लागार, पर्यावरण तज्ज्ञ आणि मायनिंगविरोधी संघर्ष समितीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. परिषदेत मायनिंगविरोधी आंदोलनाच्या न्यायालयीन लढ्याची दिशा ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील असनिये मायनिंगबाबत पंतप्रधान कार्यालयाने घेतलेली दखल आणि जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मायनिंग प्रकल्पाला वन विभागाने नाकारलेली परवानगी, या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मायनिंग प्रकल्पाला वन विभागाने परवानगी नाकारली आहे. केसरी फणसवडे गावात गोव्याच्या धेम्पो उद्योग समूहाने मायनिंग प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे या उद्योग समूहाने राज्य सरकारशी 1 हजार कोटींचा करार केला होता. पण वन विभागाच्या हरकतीनंतर हा करार आता फेटाळण्यात आला आहे.

close