‘ठाण्याचे त्रिविभाजन करा’

April 4, 2010 10:04 AM0 commentsViews: 7

4 एप्रिल ठाणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात होती. आता या जिल्ह्याचे द्विविभाजनाऐवजी त्रिविभाजन व्हावे, तसेच नवी मुंबई हा वेगळा जिल्हा करण्यात यावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. नवी मुंबई निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात ही मागणी करण्यात आली आहे.यासोबतच कोपर खैरणे ते विक्रोळी पूल हा एमएमआरडीएकडून बांधण्यात येईल, तसेच नवी मुंबई महापालिकेकडून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येईल, यात विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांपासून सर्वच शालोपयोगी वस्तू मोफत देण्यात येतील, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

close