अघोषित संपत्ती सप्टेंबरपर्यंत जाहीर करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन

June 26, 2016 9:02 PM0 commentsViews:

modi man ki baat26 जून : नागरिकांनी आपल्याकडे असलेली अघोषित संपत्ती जाहीर करावी आणि त्याचा दंड भरावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मध्ये केलं.

अघोषित म्हणजेच बेकायदा संपत्तीची नोंद सरकारकडे व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेला पुन्हा सप्टेंबर महिन्यांपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी आपल्याकडची अघोषित संपत्ती जाहीर केली तर कुठलीही कारवाई होणार नाही.नंतर मात्र कडक कारवाई केली जाईल असे संकेतही पंतप्रधानांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा