तब्बल 69 वर्षांच्या काळोखानंतर ‘हे’ गाव झालं प्रकाशमय !

June 26, 2016 9:23 PM0 commentsViews:

संदीप राजगोळकर,कोल्हापूर – 26 जून : आपल्या घरातली विज काही वेळ गेली की घरातली सगळी विद्यूत उपकरणं बंद पडतात. आपली अनेक काम खोळंबतात. पण स्वातंत्र्याच्या तब्बल 69 वर्ष वीज नसताना आयुष्य जगलेल्या ग्रामस्थांच्या जीवनात आता प्रकाश आलाय. होय, कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातल्या एका वाडीवर शुक्रवारी वीज पोहोचलीय.

kol_bhurdad_gaoया प्रतिक्षानं कळायला लागल्यापासूनच वीजेची प्रतिक्षा केली होती. आणि आज तिचं जीवन प्रकाशमय झालंय. भुदगरड तालुक्यातल्या भटवाडी आणि तांब्याचीवाडी या 2 वाड्या स्वातंत्र्यानंतरही वीजेपासून वंचित होत्या. डोंगराळ भाग, जंगलाचा भाग म्हणून खरं तर या भागाला ओळखलं जातं. या नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन भुदगरडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न करून या गावांपर्यंत वीज पोहोचवली.

सरकारी काम म्हटलं की दिरंगाई ही आलीच…पण महावितरणच्या अधिकार्‍यांनीही भटवाडी आणि तांब्याचीवाडीला वीजपुरवठा करण्याचा ध्यास घेतला.

या दोन्ही वाड्या विकासापासून इतक्या वंचित होत्या की, घरातल्या दळणासाठीही महिलांना 8 किलोमीटर अंतर कापावं लागायचं..मोबाईल चार्जिंगसाठी दुसर्‍या गावांमध्ये जावं लागायचं. विद्यार्थ्यांना दिव्याखाली अभ्यास करावा लागायचा.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड, गगनबावडा या तालुक्यांमध्ये अजूनही भटवाडी आणि तांब्याचीवाडी सारख्या अनेक वाड्या विकासापासून आणि विजेपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या कामाचा आदर्श घेतला तर नक्कीच अशा
वाड्यांही प्रकाशमान होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा