हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश ?, उद्या हायकोर्टात फैसला

June 27, 2016 1:47 PM0 commentsViews:

Haji-Ali-Women-banned-protest-hawkfeed1मुंबई- 27 जून : हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देण्याबाबत मुंबई हायकोर्ट उद्या (मंगळवारी) निकाल देणार आहे. हा निकाल महिलांच्या बाजूनं दिल्यास, उद्या मुस्लिम महिला हाजी अलीच्या मजारला जाऊन धडकणार आहेत.

ऑल इंडिया मुस्लिम आंदोलनच्या राज्य समन्वयक खातून शेख यांनी हाजी अली दर्ग्यात मजारपर्यंत जाण्याचा इशारा दिलाय. कुराणमध्ये महिलांवर कोणताही अन्याय केलेला नाहीये. यापूर्वी महिलांना हाजी अलीच्या मजारपर्यंत जाण्याचा अधिकार होते, मग आताच तो हक्क का काढून टाकण्यात आला असा सवालही खातून यांनी विचारला आहे. तसंच निकाल आमच्या बाजूनं लागला नाही, तर आम्ही निश्चितपणे सुप्रीम कोर्टात जाणार असंही खातून यांनी स्पष्ट केलंय. याआधीही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जाण्यासाठी आंदोलन केले होते. पण, त्यांनाही मजारपर्यंत जाऊ देण्यात आलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा