बोरिवलीत शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले

June 27, 2016 2:55 PM0 commentsViews:

मुंबई – 27 जून : शिवसेना भाजपमधील वाद काही शमताना दिसत नाहीये. बोरिवलीत भगवती हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते ऐकमेकांशी भिडले. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

sena_vs_bjp_borivaliबोरिवलीत भगवती हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाजप खासदार गोपाळ शेट्टी, सेना आमदार प्रकाश सुर्वे, महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरणं या नेत्यांनाही कठीण झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजपमध्ये शोलेगिरी सुरू आहे. या शोलेगिरीचा उत्तरार्ध बोरिवलीत पाहायला मिळाला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा