अदिवासी विद्यार्थ्यांनी बनवली दुर्बीण

April 4, 2010 10:21 AM0 commentsViews: 125

4 एप्रिल स्वदेस सिनेमात गावात जाऊन दुर्बिणीच्या माध्यमातून मुलांना ग्रह-तारे दाखवणारा शाहरुख सगळ्यांनीच पाहिला. पण अर्थात तो सिनेमा होता. पण नंदुरबार जिल्ह्यातील वेली या अदिवासी पाड्यावरच्या मुलांनी हा सिनेमा सत्यात उतरवला आहे. त्यांनी दुर्बिणीतून ग्रह-तारे पाहिले नाहीत तर, त्यांच्या शाळेतील सगळ्याच मुलांना हे शक्य व्हावे, यासाठी एक चार इंचाची दुर्बिण तयार केली आहे.दुर्बीण बनवण्याचा ध्यास घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी थेट पुण्यातील खगोलशास्त्राचे संशोधन करणारी आयुका ही संस्था गाठली. आणि तेथील शास्त्रज्ञांच्या मदतीने तयार केली चार इंचाची दुर्बीण. पण त्यामागे मोठी मेहनत होती.दुर्बिणीचा आरसा तयार करण्यासाठीच काच आठ दिवसांपर्यंत घासावी लागली. त्यानंतर त्या काचेवर सिल्व्हर कोटींग करण्यात आले. आणि मग ती पाईपमध्ये बसवून त्यावर आयपीस लावण्यात आले. आणि तयार झाली, मुलांची इच्छा पूर्ण करणारी जादू की छडी अर्थात दुर्बीण. यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांचीही मदत मिळाली. पण आता त्यांना एवढ्यावरच थांबायचे नाही. तर या दुर्बिणीच्या माध्यमातून त्यांना गावांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही प्रयत्न करायचा आहे.हे सगळे शक्य झाले, ते आयुकाच्या मदतीमुळे. यापुढेही गावांमधील मुलांना अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याचा आयुकाचा विचार आहे. कदाचित यामुळेच अनेक मुलांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.

close