चिलीचा डब्बल ‘तडका’, अर्जेंटिनाला लोळवून ‘कोपा अमेरिका’चे पटकावले जेतेपद

June 27, 2016 12:14 PM0 commentsViews:

27 जून : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या कोपा अमेरिका कपवर सलग दुसर्‍यांदा चिलीने नाव कोरलं आहे. पॅनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 ने अर्जेंटिनावर चिलीने विजय मिळवला. त्यामुळे 23 वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी अर्जेंटिना अयशस्वी ठरली.

chiliअत्यंत अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघानी कडवी झुंज दिली. अखेरीस हा सामना पॅनल्टी शुटआऊटवर येऊन ठेपला. पण ‘तिखट’ चिलीचा सामना करताना लिओनेल मेस्सीने पॅनल्टी शुटआऊट दरम्यान गोल करु शकला नाही. पॅनल्टी शुटआऊटमध्ये चिलीने 4-2 असा अर्जेंटिनाचा पराभव केला. त्यामुळे जगभरात कोट्यवधी चाहत्यांची निराशा झाली. चिलीकडून अर्जेंटिनाला याआधीच्या फायनलमध्येही पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अर्जेटिनानं 1993 मध्ये कोपा अमेरिका कप जिंकला होता. त्यानंतर त्यांना एकाही मेजर टुर्नामेंटचं अजिंक्यपद पटकावता आलं नव्हतं.

बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभव करून कोपा अमेरिकाची ट्रॉफी पटकावल्यानंतर चिलीच्या फुटबॉलवेड्या चाहत्यांनी अक्षरशः जल्लोष केला. सांतियागो शहराच्या रस्त्यावर चाहत्यांनी आपल्या संघाचा जयघोष करत आनंद साजरा केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा