नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 3 जणांना अटक

June 27, 2016 5:31 PM0 commentsViews:

rape_634565नागपूर – 27 जून : नागपुरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या इंदिरानगर झोपडपट्‌टी परिसरात एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याच परिसरातील 2 अल्पवयीन आरोपींसह आणखी एका अशा 3 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

इंदिरानगर परिसरात मोलमजुरी करणार्‍या एका कुटुंबातील या 10 वर्षीय मुलीला चॉक्लेटचे आमिष दाखवून त्यांच्याच शेजारी राहणार्‍या तिघांनी तिला इंदिरानगराच्या मागील रिकाम्या जागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी मुलीने आपल्या आईवडिलांना याची माहिती दिल्यावर गणेशपेठ पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा