लोणावळ्यात मेणाचे म्युझियम

April 4, 2010 12:11 PM0 commentsViews: 7

4 एप्रिल मेणाचे हुबेहूब पुतळे म्हटले की आठवते ते लंडनचे मादाम तुसाँ म्युझियम. पण आता आपल्याला असे म्युझियम पाहायला मिळणार आहे ते लोणावळ्याजवळच्या वरसोली गावामध्ये. पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या वरसोली गावात हे सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम तयार करण्यात आले आहे. या म्युझियमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, ऑस्कर विजेता रसुल पुकुट्टी, बेनझीर भुट्टो, हिटलर तसेच केरळमधील काही नामवंतांच्या प्रतिकृती आहेत. पुढील काही दिवसांत येथे बॉलीवूड स्टार्सचेही मेणाचे पुतळे तयार करण्यात येणार आहेत.

close