देहुनगरी तुकोबांच्या गजराने दुमदुमली, पालखीचं झालं प्रस्थान

June 27, 2016 7:18 PM0 commentsViews:

27 जून : तुकोबा-तुकोबाचा नामाचा जयघोष आणि टाळ मृदगांचा गजर करत जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं आहे.tukaram+palkhi

तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी महाराष्ट्राभरातून वारकरी आज देहूत दाखल झाले होते. त्यामुळे या भक्तीमय सोहळ्याला देहुमध्ये वारकर्‍यांचा आनंद आणि उत्साहाला उधाण आलं होतं.  भजन, कीर्तन, भारुड गात हे वारकर्‍यांनी देहुनगरी दणाणून सोडली.

तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम देहुतच इनामदार वाड्यात असणार आहे. यावर्षी तुकाराम महाराजांचा 331 वा पालखी सोहळा साजरा करण्यात येत असून या वर्षीची ही वारी स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषण मुक्त वारी साजरी करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा