कॅमेरा ऑपरेट करा तुमच्या आवाजावर, रिलायन्सचा ‘अर्थ 2′ लाँच

June 27, 2016 9:20 PM0 commentsViews:

27 जून :  रिलायन्सच्या स्मार्टफोन प्लसच्या श्रेणीतल्या नवीन ‘अर्थ 2’चं आज रिलायन्स डिजिटलच्या प्रभादेवीच्या स्टोअरमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.arth2

‘अर्थ 2′ स्मार्टफोन प्लस हा लाईफच्या एलिमेंट्स कलेक्शनमधला दुसरा अल्ट्रा प्रीमियम फोन आहे.आवाजाने नियंत्रित होणारा कॅमेरा हे या मोबाईलचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एकंदरीतच या स्मार्टफोनने ग्राहकांना अनोखा डिजिटल अनुभव मिळणार आहे. या अनावरण सोहळ्याचं 900 शहरात आणि जवळपास 20 हजार विक्रेत्यांसमोर सायमलकास्टद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं. अशा पद्धतीने केलेले हे उत्पादनाचं सर्वात मोठं सादरीकरण ठरलं. या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण फेसबुक पेजवरही करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा