बाप्पाला सुगंधी गारवा

April 4, 2010 12:43 PM0 commentsViews: 4

4 एप्रिलउन्हाळ्याच्या त्रासानं सगळेच वैतागलेत. मग गणपतीबाप्पा तरी त्याला अपवाद कसा असणार? गणपती बाप्पाला हा उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात वासंतिक उटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मूर्तीला आणि गाभार्‍याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुंगधाच्या फुलांची आरास करण्यात आली होती. मोगरा, गुलाब, जास्वंद, जाई-जुई अशा अनेक फुलांचा त्यामध्ये वापर करण्यात आला होता. तब्बल 25 लाख फुलांचा वापर करून या संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली होती.

close