सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच सातवे वेतन आयोग लागू ?

June 28, 2016 3:22 PM0 commentsViews:

seven vetan aayog दिल्ली – 28 जून : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची घोषणा केंद्र सरकार लवकरच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन- भत्ते पेन्शनमध्ये कमीत कमी 23.55 टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी 70,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जानेवारी 2016 पासून या शिफारशी लागू होतील. एकूण 23.55 टक्के वाढीमध्ये भत्त्यांतील वाढही समाविष्ट आहे. निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या पेंशनमध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगाचा निर्णय उद्या झाल्यास ऑगस्ट महिन्यात कर्मचार्‍यांच्या हातात वाढीव पगार मिळू शकतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा