सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा राडा

June 28, 2016 7:46 PM0 commentsViews:

28 जून : शिवसैनिकांनी पुन्हा एकदा सुधींद्र कुलकर्णी यांना टार्गेट केलंय. सुधींद्र कुलकर्णी यांच्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांनी राडा घातला. पोलिसांनी या दोन शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय. या राड्यानंतर कुलकर्णी यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली.

kulkarini_vs_senaसीएसटी भागातील मुंबई पत्रकार संघात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई-कराची फ्रेंडशीप फोरम अंतर्गत एक कार्यक्रम आयोजित केला होता. ‘तस्बीर ए मुंबई-तस्बीर ए कराची’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पाकिस्तानातील फोटोग्राफर्स उपस्थित होते. याचा निषेध करण्यासाठी दोन शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेत राडा घातला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या दोन्ही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आणि पत्रकार परिषदेतून बाहेर नेलं. त्यानंतर पत्रकार परिषद सुरळीत पार पडली. याआधीही सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला होता. त्याला विरोध करत शिवसैनिकांनी कुलकर्णी यांना काळं फासलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा