साध्वी प्रज्ञा सिंहला तपासाच्या आधारे क्लिन चिट नाही, जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

June 28, 2016 5:22 PM0 commentsViews:

28 जून : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने क्लिन चिट दिली होती. मात्र, आज एनआयएच्या विशेष कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसंच एनआयएने साक्षीदारांचा जवाबाच्या आधारे साध्वीला क्लीन चीट दिली असेल पण ही क्लीन चिट तपासाच्या आधारे नाही असंही कोर्टाने स्पष्ट करत एनआयएला फटकारुन काढलं.sadhavi

29 सप्टेंबर 2008 साली बॉम्बस्फोटाने मालेगाव शहर हादरलं होतं. या स्फोटात 6 जण ठार तर 101जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी सगळे पुरावे जमा करून कोर्टापुढे सादर केले होते. पण एनआयएकडून सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पुराव्याअभावी या प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह हिच्यासह सहा जणांना क्लिन चिट दिली.

क्लिन चिट मिळाल्यामुळे अपेक्षेप्रमाणे साध्वीने कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. परंतु, कोर्टाने साध्वीचा अर्ज फेटाळून लावला. कोर्टाने सुनावणी दरम्यान काही मुद्दे उपस्थित केले. एनआयएनं एटीएसकडून तपास हाती घेतल्यावर पुढील तपास करण्याऐवजी नव्याने तपास केला. त्यामुळे एनआयएने केलेले दावे कोर्टाने फेटाळून लावले आणि मकोका अंतर्गत असलेले आरोप काढण्यास नकार दिला. तसंच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरविरोधात यापूर्वी 3 साक्षीदारांचा जबाब कोर्टाने ग्राह्य धरला आहे. सीआरपीसी 164 नुसार साक्षीदारांचा जबाब ग्राह्य धरण्यात आला. त्यासाठी राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी केसचा संदर्भही कोर्टाने दिला. या मुद्याच्या आधारे कोर्टाने साध्वीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा