मुंबई इंडियन्सचा सातवा विजय

April 4, 2010 12:48 PM0 commentsViews: 1

4 एप्रिलआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमने सातवा विजय नोंदवला आहे. डेक्कन चार्जर्स टीमचा त्यांनी 63 रन्सनी पराभव केला. मॅचमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही मुंबई टीमचेच वर्चस्व होते. मुंबई टीमने पहिली बॅटिंग करताना पाच विकेटवर 178 रन्स केले. सचिन तेंडुलकरने 35 रन्स करत टीमला चांगली सुरुवात करुन दिली.पण प्रग्यान ओझा आणि राहुल शर्माच्या शानदार स्पेलमध्ये मुंबईने तीन विकेट लागोपाठ गमावल्या. आणि टीमची अवस्था नवव्या ओव्हरमध्ये तीन विकेटवर 68 रन्स अशी झाली. पण त्यानंतर सौरव तिवारी आणि अंबाती रायडू यांनी इनिंग सावरली आणि वाढवलीही. दोघांनी 75 रन्सची पार्टनरशिप केली. रायडूने शानदार हाफ सेंच्युरी केली. याला उत्तर देताना डेक्कनसाठीही गिब्ज आणि गिलख्रिस्ट यांनी चांगली सुरुवात केली. पण झहीर खानने दोन लागोपाठ ओव्हर्समध्ये दोघांना आऊट केलं. आणि त्यानंतर डेक्कनची मिडल ऑर्डर झटपट आऊट झाली. लक्ष्मण, सायमंड्स आणि रोहीत शर्मा हे बॅट्समनही मोठा स्कोअर करु शकले नाहीत. आणि तिथेच डेक्कनचा पराभव निश्चित झाला. अखेर निर्धारित वीस ओव्हर्समध्ये डेक्कनची टीम 115 रन्सच करू शकली.

close