‘एक कप कॉफीसह..’, मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

June 28, 2016 9:36 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई -28 जून : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनेकजण स्वप्नपूर्ती साठी येत असतात. पण स्वप्न पूर्ण करता करता ते इतकं वाहत जातात की त्यांनी आपण कुठे पोहोचतोय हे लक्षात येत नाही. मुंबईत मॉडेल किंवा अभिनेत्रींपासून ते अगदी सामान्य महिलांचीही कशी फसवणूक होते. अशा एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश झालाय. तब्बल 300 पेक्षा जास्त मुलींची पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून सुटका केलीय. हे सेक्स रॅकेट एका कोडवर्डवर चालतं असल्याचं समोर आलंय.sex_racket

झगमगत्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मुंबईकडे धाव घेतात.काहींची स्वप्न पूर्ण होतात..तर बर्‍याच जणांना स्ट्रगल करावं लागतं. या झगमगत्या दुनियेचा एकदा का चस्का लागला की लाईफस्टाईलही बदलते. जवळ असलेले पैसे अपुरे पडायला लागतात आणि नेमक्या याच परिस्थितीचा फायदा काही लोक घेतात. आणि वेगवेगळी आमिषं दाखवून या स्ट्रगलर्सना वेश्याव्यवसायात ढकललं जातं.अशा 300 पेक्षा जास्त मुलींची मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी सेक्स रॅकेटमधून सुटका केलीय.

हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट ऑनलाईन चालतं. एस्कॉर्ट सर्व्हिससाठी वेबसाईट असते.पोलिसांची नजर टाळण्यासाठी एक खास कोडवर्ड दिला जातो..यात मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा रेट दिला जातो.

मॉडेल्सचा कोडवर्ड
दोन तास एक कप कॉफी सह 10000/- रुपये
चार तास दोन कप कॉफी सह 16000/-रुपये
डिनर डेट 8 तसंच 30000/- रुपये
एक्स्ट्रा कप कॉफी 6000/- रुपये

झगमगत्या दुनियेच्या आकर्षणापोटी अनेकजण आपलं आयुष्य उद्‌ध्वस्त करून घेतात. तर काहींना भूलथापा देऊन या व्यवसायात ढकललं जातं. ही मानवी तस्करी थांबवायची असेल तर पोलिसांसोबतच समाजानंही दक्ष राहायला हवं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा