शाहरूख, प्रीती आमने-सामने

April 4, 2010 12:58 PM0 commentsViews: 1

4 एप्रिलआयपीएलमध्ये आज आमने सामने असणार आहेत, शाहरूख खान आणि प्रीती झिंटा. पण कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन दरम्यान रंगणारी ही मॅच शाहरुख खानसाठी अधिक महत्वाची असणार आहे. पराभवाची मालिका खंडित करत नाईट रायडर्सने पुन्हा एकदा स्पर्धेत कमबॅक केला आहे. प्रीतीच्या किंग्ज इलेव्हनचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आठ मॅचपैकी तब्बल 7 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आता किंग्ज पराभवाची मालिका खंडित करणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आयपीएलची दुसरी मॅच रंगणार आहे, ती बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान. दोन्ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. पण पॉइंट्स दोघांचेही दहा- दहा आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकणारी टीम टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर जाईल. आणि त्या दृष्टीने ही मॅच महत्त्वाची असणार आहे.यापूर्वी या दोन टीम्स बंगलोरमध्ये आमने सामने आल्या होत्या. आणि या मॅचमध्ये दिल्लीने बाजी मारली होती. मागच्या काही मॅचमध्ये दिल्ली टीमचा फॉर्मही चांगला आहे. कोलकाता आणि राजस्थान टीमना त्यांनी धूळ चारली आहे. दुसरीकडे बंगलोर टीमने पंजाबवर विजय मिळवला असला तरी त्या आधीच्या मॅचमध्ये त्यांना चेन्नई आणि बंगलोर टीमने हरवले होते. दोन्ही टीमची बॅटिंग चांगली आहे.

close