इस्तंबूलमध्ये विमानतळावर आत्मघातकी हल्ला, 36 ठार

June 29, 2016 1:37 PM0 commentsViews:

istanbul_attack29 जून : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल बॉम्बस्फोटाने हादरली. इस्तंबूलच्या विमानतळावर दोन बॉम्बस्फोट झाले, यात किमान 36 जणांना मृत्यू झालाय तर 140 जण जखमी आहेत. जखमींना टॅक्सींमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

विमानतळावर स्फोटानंतर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांनी परिसरात अंदाधुंद गोळीबार केली त्याला पोलिसांची प्रत्युत्तर दिला. या गोळीबारानंतर 3 दहशतवाद्यांनी स्वतःला स्फोटाने उडवून घेतलं. केमाल आतातुर्क विमानतळाच्या सुरक्षा चाचणीच्या ठिकाणाजवळही हल्ला करण्यात आला. सध्या विमानतळावरून सर्व उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. यामागेही आयसिसचाच हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा