सरकारी कर्मचार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू, ‘छप्पर फाडके’ पगारवाढ

June 29, 2016 2:02 PM2 commentsViews:

दिल्ली – 29 जून : केंद्रीय कर्मचार्‍यांचे अखेर अच्छे दिन आले आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू
करण्यात आलीये. सातव्या आयोगामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात कमीतकमी 23 टक्क्यांची वाढ होणार आहे. याच फायदा अर्थातच लाखो कर्मचार्‍यांना होणार आहे. या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 25 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.7th pay com

केंद्र सरकारने अखेर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केलीये. या वर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 70,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण 23.55 टक्के वाढीमध्ये भत्त्यांतील वाढही समाविष्ट आहे. निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या पेंशनमध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाचा निर्णय झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात कर्मचार्‍यांच्या हातात वाढीव पगार मिळणार आहे. गेल्या 70 वर्षांतील ही सर्वात मोठी वेतन वाढ आहे. ज्यांचा मुळ पगार हा 7 हजार असेल त्यांच्या पगार आता 18 हजारांवर पोहचणार आहे. ज्यांचा मुळ पगार 13,500 आहे अशांचा पगार आता 40,500 रुपये असणार आहे. जवळपास तीनपट ही पगार वाढ आहे. पण, या घोषणेचा बोजा जनतेवर पडणार आहे.

अशी आहे आयोगाच्या शिफारशी

- किमान मूळ वेतन 18 हजार
- कमाल 2.5 लाख रुपये
- मूळ वेतन तीनपटीनं जास्त, पेन्शनमध्ये 24 टक्के वाढ?
- ग्रॅज्युएटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख ?

 किती वाढेल मूळ वेतन?
- 7 हजारांवरून 18 हजार
- 13,500 वरून 40,500 रुपये
- 21 हजारांवरून 63 हजार
- 46,100 वरून 1,38,300 रुपये
- 80 हजारांवरून 2,20,000 रुपये
- 90 हजारांवरून 2,50,000 रुपये

महाराष्ट्राची स्थिती

- जनतेवर करवाढीमुळे नवा बोजा
- 19 लाख सरकारी कर्मचारी
- 6.5 लाख निवृत्तिवेतनधारक
- सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, महापालिका, सरकारी उपक्रमांत सुमारे 10 लाख कर्मचारी
- या कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्यानं वेतनवाढ लागू करण्याची शिफारस
- सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारावर दरमहा किमान 18 हजार कोटींची तरतूद आवश्यक
- महसूल खर्चात सध्या 38.5 टक्के रक्कम पगारावर खर्च
- निवृत्तिवेतनधारकांसाठी दरमहा 17 हजार 633 कोटींची तरतूद

सरकारी तिजोरीवर बोजा

- 25 हजार कोटींचा बोजा
- केंद्र सरकारचे पगार, पेन्शन बील 2016-17 मध्ये 4.33 लाख कोटींवरून 5.35 लाख कोटी
- जीडीपीमध्ये पगार अलाउंसचा भाग 0.65 टक्क्यांवरून 0.7 टक्के वाढ
- अर्थसंकल्पात 74 हजार कोटी तर रेल्वे अर्थसंकल्पावर 28 हजार कोटींचा बोजा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Mita Nand

    Konachya khandyavar konache ojhe!!

  • Mangesh Monde

    he aayog aata band kele pahijet…muthbhar sarkari ani nimsarkari lokanna hava tasa pagar dyayacha aani tyancypekshahi jast kam karanaare man privet sector mashye asnarya lokana matra tutpunjha paggar….yane gariba aani shrimatichi dari vadat jail .aani he samajasathi marak asel……hi pagarvad karanyapeksha yevadach fund vivid jivanavasyak gosthinsathi subsidila dila aani mahagai atokyat anayala havi. mhanaje ti ek prakare sarvannach pagarvad hoil….sarakarne yakade dolas pane laksh dyayala have aani paule takayala havit