‘शोले’नंतर धुसफूस सुरूच, सेनेच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार

June 29, 2016 2:31 PM0 commentsViews:

मुंबई, 29 जून : भाजप आणि शिवसेनेमध्ये उडालेल्या शाब्दिक युद्धानंतर अजूनही धुसफूस सुरूच आहे. मुंबईत महापालिकेच्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला. आशिष शेलार यांनी या सोहळ्याकडे सपेशल पाठ फिरवली.
ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पंपिंग स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.brtaniya_sena_bjp

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये शोले नाट्य घडलं. ऐकमेकांच्या नेत्यांना असरानी, गब्बर, सांबा अशा उपमा दिल्यामुळे युतीमध्ये वातावरण चांगलेच तापले होते. शिवसैनिकांच्या शोलेगिरीमुळं संतप्त झालेल्या भाजपने आज शिवसेनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मुंबई महापालिकेच्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा लोकार्पण सोहळ्‌याला उद्धव ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी या कार्यक्रमावर भाजपनं बहिष्कार टाकला. आशिष शेलार यांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला.

जोरदार होर्डिंगबाजी

भाजपनं बहिष्कार टाकला असला तरी दोन्ही पक्षानं कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरदार होर्डिंगबाजी केली. शिवसेना आणि भाजपनं या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय. या सोहळ्याला शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनाही निमंत्रण होतं. पण भाजपनं ऐनवेळी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. गेल्या काही दिवसांपासून युतीत सुरू असलेल्या शोलेगिरीचा उत्तरार्थ होर्डिंगबाजीतून दिसून आला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला. पण, उद्धव ठाकरे यांनीही या कार्यक्रमात भाजपवर काही बोलण्याचं टाळलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा